पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतोय… तुम्ही बँक खातं तपासलं का?
लोकगर्जनान्यूज
बीड : ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. ती पीक विमा रक्कम खात्यावर जमा होत आहे. आज गुरुवारी केज व धारुर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर बजाज अलियान्झ कंपनीचे रक्कम जमा झाल्याचे मेसेज आले. परंतु रक्कम कमी जास्त असल्यामुळे नेमकं किती टक्यांनी रक्कम जमा होत आहे याचा ताळमेळ लागत नाही.
यावर्षी खरीप हंगामात पीकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हाताश आहे. शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४१० कोटींची मदत घोषित केली. पण यापेक्षाही सततच्या पावसाने नुकसान झालेले लाखो शेतकरी सध्यातरी ऑक्सिजनवर आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळणार की, नाही? याबाबत यक्ष प्रश्न आहे. तसेच पीक विमा मिळणार का? हा ही मोठा प्रश्न होता. याकडेही शेतकरी डोळे लावून बसला होता. शेती विमा कंपनी कधी काय? नियम पुढं करेल आणि सन २०२० सारखं पीक विमा रेंगाळत पडेल अशी शंका होती. परंतु आज गुरुवारी ( दि. १५ ) सायंकाळी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याची आनंदाची बातमी कानावर पडली आहे. यामध्ये धारुर, केज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बजाज अलियान्झ कंपनीकडून रक्कम जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. परंतु ही आलेली रक्कम कोणाला कमी कोणाला जास्त आहे. त्यामुळे रक्कम आणि क्षेत्रफळाचा हिशोब लागत नाही. त्यामुळे विमा कंपनीने क्लेम नेमका कोणत्या नियमानुसार दिला याचा सध्यातरी ताळमेळ नाही. पीक विमा जमा झालेले सर्व शेतकरी तक्रार करणारे आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार केलेली नाही. त्यांचं काय? हा प्रश्न कायम आहे. परंतु विमा रक्कम मिळत असून हे सत्य आहे. कदाचित ती तुमच्या खात्यात ही आली असेल तर तपासून पहा.