पीक विमा प्रश्नी ‘या’ गावातील तरुणाची केज तहसीलवर पदयात्रा; तक्रार अर्ज दाखल करणार

लोकगर्जनान्यूज
केज तालुक्यातील आडस येथील सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर हे बुधवारी ( दि. ११ ) सकाळी ८ वा. शेतकऱ्यांच्या पीक विमा वैयक्तिक तक्रार अर्ज डोक्यावर घेऊन अर्ध नग्न अवस्थेत श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक आडस ते तहसील कार्यालय,केज असं २५ कि.मी. पायी जाऊन प्रशासनाला तक्रारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला यामुळे मोठं नुकसान झालं. याचं अनुदान नाही की, हक्काचा पीक विमाही जाचक अटीमुळे मिळाला नाही. यावर कोणीच ब्र काढायला तयार नाही. शेतकरी व्याकुळ नजरेने मदत ,पीक विमा मिळेल या आशेने डोळे लावून बसला आहे. या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आडस येथील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर हे पुढं आले. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे पीक विमा प्रश्नी वैयक्तिक तक्रार तक्रार अर्ज घेतली. आडस मधून जवळपास दिड हजार अर्ज आली असून तसेच केकाणवाडी, होळ, मुलेगाव, उंदरी सह आदि गावातील दोन ते तीन हजार अर्ज आली आहेत. ही अर्ज तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला सादर करण्यासी आज बुधवारी ( दि. ११ ) सकाळी ८ वाजता आडस येथील शिवाजी चौकातून अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालय येथे पायी चालत जाऊन दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोणालाही सहभागी होण्याचे आवाहन शिवरुद्र यांच्याकडून करण्यात आले नाही. ते स्वतः एकटेच निघणार असून आडस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळमअंबा, चंदन सावरगाव, कुंबेफळ, केज तहसील कार्यालय असा मार्ग रहाणार आहे. त्यांच्या सोबत किती शेतकरी सहभागी होणार? याची उत्सुकता लागली आहे.
* शेतकऱ्यांची अवस्था दिसावी हा उद्देश
अतिवृष्टी, न मिळालेली नुकसान भरपाई व पीक विमा यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. ही अवस्था प्रशासनाला व शासनाला दिसावी आज शेतकऱ्यांकडे बसच्या टिकिटसाठी पैसा नाही की, अंगभर तो कपडे घालण्याची त्याची ऐपत राहिली नाही. म्हणून मी बनियन व फाटकी इजार घालून आडस येथून केज तहसील कार्यालयावर डोक्यावर तक्रार अर्जांचा गट्टा घेऊन पायी जाणार आहे.
शिवरुद्र आकुसकर
सामाजिक कार्यकर्ता, आडस