आपला जिल्हाकृषी
पीक विमा प्रश्न!शिवरुद्र आकुसकर यांची शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज घेऊन तहसील कडे आगेकूच

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस व परिसरातील ज्या शेतकऱ्यांना जाचक अटीमुळे पीक विमा मिळालेला नाही त्यांचे वैयक्तिक तक्रार अर्ज घेऊन केज तहसील कार्यालयाकडे सकाळी आडस येथून ८:३० वाजता निघाले आहेत.
अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडले आहेत. परंतु त्यांना ना नुकसान भरपाई मिळाली ना पीक विमा हा प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आडस येथील सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर हे आडस ते केज पायी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. सोबत आडसचे सरपंच बालासाहेब ढोले, माजी उपसरपंच अंगद पाटील, पत्रकार रामदास साबळे, भुजंग इंगोले, संतोष म्हेत्रे, शाम आकुसकर आहेत.