पिकअपची दुचाकीला धडक धारुर तालुक्यातील तरुण ठार
लोकगर्जनान्यूज
धारुर : कळंब येथे वास्तव्यास असलेल्या धारुर तालुक्यातील तरुणाच्या दुचाकीला पिकअप चालकाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाच्या डोक्याला मार लागून ठार झाल्याची घटना कळंब येथे बार्शी रोडवर बागे समोर आज बुधवारी ( दि. १४ ) ४:३० वाजता घडली.
महेबुब निजाम पठाण रा. अंजनडोह ( ता. धारुर ) असे मयताचे नाव आहे. ते शंभु महादेव साखर कारखान्यावर नोकरीला असल्याने कळंब येथेच वास्तव्यास आहे. आज बुधवारी ( दि. १४ ) ते काही कामानिमित्त घराबाहेर पडले. महेबुब हे बार्शी रोडवरील बागे समोरुन दुचाकीवरुन जाताना पिकअपची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक बसताच महेबुब पठाण हे जोरात रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह कळंबच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु मयताचे आई-वडील सह काही जवळचे नातेवाईक कर्नाटक राज्यात कारखान्याला गेले असल्याने अद्याप शवविच्छेदन झाले नाही. ते आल्यानंतर शवविच्छेदन होईल असा अंदाज आहे. घटनेची माहिती गावात मिळताच हळहळ व्यक्त केली जात आहे.