पिंपळनेर येथे स्नेहसंमेलन उत्साहात

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिनी चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी विविध गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सत्येंद्र पाटील तर प्रमुख पाहुणे प्रा.विजय पवार, कुंडलिक खांडे, बाबुसेठ लोढा, सुनील पाटील, राजाभाऊ गवळी, मनोज पाटील, किशोर सुरवसे, संतोष मुंडे, परमेश्वर सातपूते, लहूजी खांडे, माणिकराव मोरे, अंगद मोरे, गणेश डोईफोडे, शरद जवळकर, निसार आतार, संतोष बडे, डॉ. प्रसाद ठोकरे, संस्थेचे प्रा.सुरेश सावंत, गणेश सावंत, भगवान जाधव, संजय नरवडे, मनिषा सावंत, गणेश नरवडे आदी उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्यांनी एका पेक्षा एक गीतांवर डान्स करत प्रेक्षकांची मने जिंकली अधीर झाले मन, शिवबा आमचा मल्हारी, सामी सामी, आई मला खेळायला जाऊ दे नव्हे, बुरुम बुरुज, श्री वल्ली, गाणं वाजू द्या, केळीवाली, गोव्याच्या किनार्यावर, पंजाबी भांगडा अशी एकापेक्षा एक गाणी सादर करत चिमुकल्यांनी धमाल उडवली यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ही आखडता हात न घेता बक्षिसांची उधळण या बाल कलाकारांवर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या विद्या अय्यर, सुरेखा यादव, राजलक्ष्मी मुळीक,ज्योती राऊत सह शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.