कृषी
पिंपळनेर येथे शिवजयंती साजरी
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश सावंत तर प्रमुख पाहूणे म्हणून सुनील ठोकरे, प्राचार्या विद्या अय्यर सह आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. सुरेश सावंत व सुनील ठोकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रा. सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाला सुरेखा यादव, राजलक्ष्मी मुळीक, ज्योती राऊत सह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.