आपला जिल्हा
पिंपळनेर येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे संकल्प सेवाभावी संस्था, राजमाता सेवाभावी संस्था व श्रीगणेश सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच राजेश गवळी तर प्रमुख पाहूणे म्हणून गणेश शिंदे, विकास वाणी, भागवत कदम, भागवत ठोकरे सह आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहूणे गणेश शिंदे व विकास वाणी यांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. यानंतर प्रमुख मान्यवरांनी जिजाऊ यांच्या कार्याची माहिती उपस्थितीतांना दिली. या कार्यक्रमाला प्रदिप आनेराव, आदीनाथ गवळी, अनिल ठोकरे, योगेश भुजबळ, अजय सिरसट, आकाश भुजबळ, विकास सावंत, उध्दव गणगे, जनार्धन पटाईत, परमेश्वर ठोकरे, रवी तेहरे सह आदी उपस्थित होते.