पिंपळनेर येथे महात्मा फुले जयंती साजरी

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे राजमाता व संकल्प सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष राजेश गवळी तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक शिवाजी धारणकर, गोकुळ गवळी, संदीप नरवडे, रवी पवार, माऊली नरवडे सह आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश गवळी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून महात्मा फुले यांच्या जीवन कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. या कार्यक्रमाला अरुण पेंढारे, बळीराम मेहत्रे, मच्छिंद्र तिरगुळ, भागवत ठोकरे, भागवत कदम, प्रदिप आनेराव, माऊली आनेराव, विशाल कदम, बंडू सातपुते, गणेश शिंदे, सिध्देश्वर तिरगुळ, सुनील ठोकरे सह आदी उपस्थित होते.