पिंपळनेर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश सावंत तर प्रमुख पाहूणे डॉ. प्रसाद ठोकरे, पं.स. सदस्य किशोर सुरवसे, उपसरपंच राजेश गवळी, उमेश आनेराव सह आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहूणे डॉ. प्रसाद ठोकरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.ठोकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यालय नियोजनबद्धपणे करत असलेल्या काम अतिशय दर्जेदार असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला योगेश भुजबळ, गोकूळ गवळी, कल्याण कदम, भागवत कदम, शेख निसार, उमेश ठोकरे, शरद जवळकर, बंडू हौसारे,गणेश तांबे, माणिकराव मोरे, संजय मोरे, रावसाहेब डोळस, अशोकराव घुगे, बाळनाथ बडे, शिवाजी जामकर सह प्राचार्या विद्या अय्यर, सुरेखा यादव, राजलक्ष्मी मुळीक, ज्योती ठोकरे, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते