पिंपळनेर येथे डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे दि. 14 एप्रिल रोजी सकाळी श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात राजमाता व संकल्प सेवाभावी संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय नरवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिरसाट, उमेश आनेराव, राम जाधव, सुनील जाधव, माधव नरवडे, अनिल शिरसाट आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर शिक्षक सचिन शिरसाट, राजेश गवळी, संजय नरवडे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला अनिल शिरसाट, बाळू वारे, अंकुश तागड, स्वप्निल शिरसाट, भागवत कदम, बाळू सावंत, मिलिंद शिरसाट सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.