पिंपळनेरचा पाणीपुरवठा होणार सुरळीत उपसरपंच राजेश गवळी यांचा पुढाकार
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील उपसरपंच राजेश गवळी यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाची वसुली होईपर्यंत स्वखर्चाने पाणीपुरवठ्यावर खर्च करून नवीन मोटार खरेदी केली आहे. यामुळे आता पिंपळनेर करांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
पिंपळनेर येथे गत पंधरा वीस दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे व दुरुस्तीअभावी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन उपसरपंच राजेश गवळी यांनी पुढाकार घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. गत दोन वर्षापासून कोरोना काळ असल्याने गावातून पाणीपट्टी व इतर कराच्या माध्यमातून मिळणारी वसुली ठप्प असल्याने विकासाची कामे करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत, त्यातच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन ची दुरुस्ती यावरही मोठा खर्च राजेश गवळी स्वतः करत आहेत. त्यातच दहा-बारा दिवसात गावात पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करणे अवघड झाले होते, या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत गवळी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची वसुली होईपर्यंत स्वखर्चाने पाणी पुरवठ्याची नवीन मोटर, स्टार्टर, वायर व पाईप एकूण 1 लाख 35 हजार रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या नवीन मोटार पूजनाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला आहे या नवीन मोटार मुळे पिंपळनेर करांना आता नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करता येणार आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मोठे कौतुक होत असून उपसरपंच राजेश गवळी यांचे अभिनंदन केले जात आहे. या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला अशोक होळकर, गणेश तांबे, रामेश्वर जाधव, प्रदीप आनेराव, अरुण पेंढारे, गंगाराम नरवडे, शेख अनिस, अशोक पटाईत, उमेश पवार, उमेश आनेराव, शंकर नरवडे, सुनील ठोकरे, भागवत कदम, माऊली आनेराव, सलीम चाऊस, शेख अमर, देविदास भोसले,भास्कर ढोकणे, अजित कुरेशी, अजय शिरसाट, सतीश इतापे, कपिल नरवडे, भागवत ठोकरे, मच्छिंद्र गणगे, मच्छिंद्र साठे, श्रीकांत ठोकरे सह ग्रामस्थ उपस्थित होते