आपला जिल्हाशिक्षण संस्कृती
पालकमंत्री धनंजय मुंडेंमुळे बीड जिल्ह्यातील उर्दू शाळांना बूस्टर!
39 शिक्षकांची पदे भरली जाणार, आजच होणार जाहिरात प्रसिद्ध
लोकगर्जनान्यूज
बीड – राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील उर्दू शाळांना बूस्टर डोस मिळवून दिला आहे. जिल्ह्यातील उर्दू शाळांमधील रिक्त असलेल्या 39 शिक्षकांची पदे भरण्यास धनंजय मुंडे यांच्या आग्रहानंतर शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.
पवित्र पोर्टलवर या 39 रिक्त पदांच्या भरती संदर्भातील जाहिरात आजच सायंकाळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रिक्त पदांची माहिती घेऊन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ही पदे भरण्यासंदर्भात आग्रही मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विभागाला निर्देश देऊन सदर पदे भरण्यास परवानगी दिल्याने जिल्ह्यातील उर्दू शाळांना बूस्टर मिळणार आहे.