पारधी समाजातील महिलेच्या अंगावर कुत्रा सोडला; कुत्र्याने लचका तोडला

केज : तालुक्यातील पारधी समाजातील महिला रस्त्याने जाताना त्यांच्या अंगावर कोत्रा सोडल्याची घटना उत्तरेश्वर पिंपरी येथे ( दि. २१ ) मार्चला घडली आहे. कुत्र्याने पायाचा लचका तोडल्याने महिला जखमी झाली. याप्रकरणी सदरील महिलेने केज पोलीसांशी संपर्क साधून अंगावर कुत्रा सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
जनाबाई शिंदे रा. उत्तरेश्वर पिंपरी ( ता. केज ) असे त्या महिलेचे नाव आहे. जनाबाई या सोमवारी ( दि. २१ ) दुपारी ३ च्या सुमारास रस्त्याने जाताना गावातील एका व्यक्तीचे त्याचा पाळीव कुत्रा अंगावर सोडून चावा घेण्याचा इशारा केला. सदरील कुत्र्याने डाव्या पायाच्या मांडीचा लचका तोडल्याने महिला जखमी झाली. यानंतर कुत्र्याच्या मालकाने घरी येऊन शिव्या दिल्याची तक्रार जनाबाई शिंदे यांनी आज ( दि
२७ ) रविवारी केली. तक्रारींमध्ये गाताडे अविनाश आणि गाताडे रवि यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.