पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीचे पाणी शेतीसाठी; ग्रामस्थांना पाणी टंचाईचे चटके
लोकगर्जना न्यूज
धारुर तालुक्यातील आसरडोह ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कवटी तांडा येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीचे पाणी सर्रासपणे शेतीसाठी वापरले जाते आहे. लोक पाणी आणण्यासाठी गेलेतर संबंधित शेतकरी भांडण करत असून यांच्यावरील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी यांच्यावरील लोकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आसरडोह ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत येत असलेल्या कवटी तांडा येथील ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून शासनाकडून विहीर खोदली आहे. परंतु ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर आहे ते याचे पाणी वैयक्तिक शेतातील पिकांसाठी वापरत आहे. येथे पाणी आणण्यासाठी गेलेतर पाणी नेऊ देत नाही. भांडण करतो. एक वर्षा पेक्षा जास्त काळ झाला आहे. या विहीरीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला अनेक वेळा सांगितले पण ते झोपेचं सोंग घेत आहेत. तसेच मागील वर्षी दि. २८ मे २०२१ सरपंचांना लेखी निवेदन देण्यात आले. आज पर्यंत याबाबत ग्रामपंचायतीने काहीच पावलं उचलली नाहीत. ( दि. १० ) जानेवारी २०२२ धारुरचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. ते तरी न्याय देतील का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. जर आम्हाला पाणी नाही मिळाले तर सर्व कवटी तांड्यावरील ग्रामस्थ पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचे काहींनी सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आसरडोह ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना फोन केला असता तो बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.