राजकारण

पाच वर्ष जनतेच्या पाठीशी असणाऱ्या मुंदडा कुटुंबासाठी विधानसभेत जनता पाठीशी उभी

लोकगर्जनान्युज

अंबाजोगाई : केज मतदारसंघात मुंदडा कुटुंब पाच वर्ष जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असतो. मतदारसंघातील कोणतीही अडचण असो ही अडचण मुंदडा कुटुंबा पर्यंत पोहोचली की, ती सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. याच कामामुळे निवडणुकीच्या काळात जनताच त्यांच्या पाठीशी उभी असते यामुळे त्यांना निवडणुकीची चिंता नसते तर या मतदारांच्या विश्वास आणि आशीर्वादाची परतफेड पाच वर्ष कशी करावी याची असते.

८० टक्के समाजकारण २० राजकारण या धोरणाप्रमाणे मुंदडा कुटुंब मागील ४० वर्षांपासून केज मतदारसंघात काम करीत आहे. निवडणुकीच्या काळा व्यतिरिक्त त्यांच्याकडे राजकारणाला थारा नसतो. मतदारसंघातील कोणीही सामान्यातील सामान्य माणसासाठी त्यांचे दार 24 तास उघडे असते. त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला माणूस रिकाम्या हाताने परत येत नाही. मग तुमचं दवाखान्याचे काम असू की, विद्युत डीपीचे असून त्यांच्यापर्यंत ते पोहोचले की, ते त्यांची जबाबदारी होते. डीपी (रोहित्र) शेतात पोहोचला की, काकाची नंदकिशोर मुंदडा यांचा संबंधित शेतकऱ्याला फोन येतो की, तुमचा डीपी शेताच पोहोचले आहे. तो उतरवून घ्या यावेळी सुकत असलेल्या पिकांकडे पाहणाऱ्या शेतकऱ्याच्य आनंदाला पारावार उरत नाही. दवाखान्यात एखादा रुग्ण गेला तर एक फोन नंदकिशोर मुंदडा,अक्षय मुंदडा अथवा आमदार ताई यातील कोणालही फोन करा. काही क्षणात एक माणूस येतो तुमच्या सोबत फिरुन तुमचं पूर्ण काम होईपर्यंत थांबून ॲडमीट करुन अथाव गरज नसेल तर तुम्हाला घराकडे वाहनात बसे पर्यंत सोबत असतो. मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या सुख, दुःखात सहभागी होत एक कौटुंबीक नाते निर्माण केले. अडचणीच्या वेळी भक्कमपणे पाठीशी उभे रहाण्याचा प्रयत्न मुंदडा कुटुंब करतो. यासाठी ते कसलीही तडजोड अथवा दिरंगाई,कंटाळा करत नाही. याची जान ठेवत केज मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार पाच वर्षात एकदा पूर्ण ताकदीनिशी व भक्कमपणे मुंदडा कुटुंबाच्या पाठीशी उभा असतो. यामुळे कितीही वादळं आले तरी ओन्ली मुंदडा ही लाट कायम असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »