पाऊस rain या 24 जिल्ह्यात मुसळधार: हवामान विभागाचा इशारा
लोकगर्जनान्यूज
महाराष्ट्रातील मुंबई,कोकणमध्ये पाऊस विश्रांती घेईल परंतु मराठवाडा, विदर्भ सह इतर भागातील 24 जिल्ह्यात मुसळधार पाऊस rain होईल असा इशारा हवामान विभागाने दिला.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. यामुळे पेरण्या उशिरा झाल्या आहेत. बीड जिल्ह्यासह आदि भागात पडलेल्या थोड्या फार पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केलेल्या बियाणे फुटले असून आता पावसाची आवश्यकता आहे. परंतु मागील पाच-सहा दिवसांपासून पाऊस rain थांबला, परंतु आज वातावरणात बदल झाला. बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागात रिमझिम पाऊस सुरू झाला. यातच हवामान विभागाने बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदुरबार,धुळे, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला. तसेच आतापर्यंत मुंबई,कोकण भागात पाऊस भरपूर झाला असून येत्या काही दिवस मुंबई,पुणे,रायगड, ठाणे,पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच याचा परिणाम आज मुंबईत दिसून आला असून येथे उष्णता वाढली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी अनेक भागात जोरदार पाऊस झाला नाही त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे. बीड जिल्ह्यातील नदीनाले अद्याप कोरडे असून, जलसाठेही वाढलेली नाहीत. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.