पहाटेच आमदार क्षीरसागर ग्राऊंडवर! गुड मॉर्निंग म्हणत शहरवासीयांशी साधला संवाद
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाची स्वच्छता करुन आमदार फंडातून सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही
लोकगर्जनान्यूज
बीड : येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी येऊन शहरवासीयांशी संवाद साधला. तसेच नपचे मुख्यकार्यकारी अधिकारी, नगरसेवक यांना सोबत घेऊन या क्रीडांगण व आयटीआय ग्राऊंडची पाहाणी केली. येथे स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या तसेच येथे काही सुविधा उपलब्ध करून करण्यासाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
आरोग्याबाबत प्रत्येक नागरिक दक्ष असून, अनेकजण सकाळी, मॉर्निंग वॉक, योगासाठी वेळ काढत आहेत. यासाठी बीड शहरातील अनेक महिला, पुरुष हे मॉर्निंग वॉकसाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाला पसंती देतात. त्यामुळे दररोज येथे गर्दी असते. पण येथील अस्वच्छता तसेच ओपन जिम असुविधा आहेत. याबाबत मागील काही दिवसांपासून तक्रारी होत्या. आज गुरुवारी ( दि. १७ ) आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगरसेवक व न.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सोबत घेऊन पहाटेच क्रीडांगण गाठलं गुड मॉर्निंग म्हणत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी क्रीडांगणावर महिला जिम सुरू करण्याची मागणी केली. तसेच नागरिकांनी विविध समस्या सांगितल्या आहेत. तसेच आयटीआय ग्राऊंडची पाहाणी केली. यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी या दोन्ही ठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. तसेच येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत यासाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता येथे सुविधा उपलब्ध होणार असे दिसून येत असल्याने आमदार संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले जात आहे.