पर्यावरण संवर्धन कामाची इच्छा असणाऱ्यांनी संपर्क करा – प्रा.ईश्वर मुंडे
किल्ले धारूर : पर्यावरण संवर्धन व विकास ही जागतीक गरज निर्माण झाली आहे. या साठी महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरणवादी विविध संघटनांना सोबत घेवून बीड जिल्हयात पर्यावरण पोषक कार्य करायचे आहे.
या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे संघटन करून पर्यावरण संवर्धन चळवळ वाढवावयाची असून यामुळे भारत देशातील जनतेचे आयुर्मान वाढण्यास मदत मिळेल. जिल्हा,तालुका व गाव स्तरावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करावयाच्या आहेत. पर्यावरण संवर्धन विकास समिती मध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या महिला,पुरूष,तरूण,तरूणी यांनी आपला बायोडाटा,या क्षेत्रातील कार्याचा अहवाल व विनंती अर्ज 9096688365 या वाट्सप नंबर वर पाठवावेत. यावरून पात्रात पाहून योग्य पद व सन्मान देवून या कार्यात सोबत घेतले जाईल
असे आवाजहन पर्यावरण संवर्धन व विकास समिती, बीडचे जिल्हाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे यांनी केले.