आपला जिल्हा

परिचारिकांच्या सतर्कतेमुळे जिल्हा रुग्णालयात मोठी दुर्घटना टळली

 

बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील वॉर्मरचे सॉकेट जळून धूर निघत असल्याचे लक्षात येताच परिचारिका अनिता मुंडे व पुष्पा माने या दोघींनी धाव घेऊन वॉर्मरचा वीजपुरवठा बंद केला. उपचार सुरू असलेल्या बालकांना सुरक्षितस्थळी हलविले. प्रसंगावधान राखून तात्काळ निर्णय घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे या परिचारिकांचे कौतुक करण्यात येत आहे.

बुधवारी ( दि. १५ ) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बालरोगतज्ज्ञ डॉ . इलियास खान व डॉ . दीबा खान राऊंड घेऊन बालकांच्या तब्येतीची माहिती नातेवाइकांना देत होते . दुसरीकडे परिचारिका माने व मुंडे या दोघी आईने दिलेले दूध बालकांना चमच्याने पाजत होत्या . मुंडे यांना काही तरी जळत असल्याचा वास आला . त्यांनी सर्वत्र नजर फिरवली १ नंबरच्या वॉर्मरमधून धूर निघताना दिसले. त्यांनी आवाज देऊन सहकारी माने यांना बोलावले . धूर निघत असलेल्या वॉर्मरमधील बाळाला दुसरीकडे ठेवले . तोपर्यंत माने यांनी सर्व १३ वॉर्मरचा वीजपुरवठा खंडित केला. धावपळ उडू नये म्हणून कोणालाही कानोकानी खबर न होऊ देता. उपचार सुरू असलेल्या १२ बालकांना इतरत्र हलवले. यानंतर डॉक्टर, मेट्रन सह इतरांना माहिती दिली. तेही धावत येऊन त्यांना मदत केली. ते उपचार सुरू असलेले बालक सुरक्षित व ठणठणीत आहेत. परिचारिका माने व मुंडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे १२ बालकांचे प्राण वाचले आहेत. तर मागे भंडार येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली. या परिचारिकांचे कौतुक करण्यात येत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कडून सत्कार

जीवाची बाजी लावत वीजपुरवठा खंडित करून १२ बालकांचे प्राण सुरक्षित ठेवणाऱ्या अनिता मुंडे व पुष्पा माने यांचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुरेश साबळे यांनी सत्कार केरुन तुमच्या कार्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »