आपला जिल्हा

पत्रकार संघ,अंबाजोगाईचे पुरस्कार संजय मालाणी, चंदन पठाण यांना घोषित

 

दर्पण दिनी ६ जानेवारीला होणार वितरण

अंबाजोगाई : पत्रकार संघ,अंबाजोगाई यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी संजय मालाणी (कार्यकारी संपादक,दैनिक प्रजापञ,बीड) तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी चंदन पठाण (कार्यकारी संपादक,सायं दैनिक बीड सिटीझन,बीड) यांची निवड करण्यात आली.दोन्ही मान्यवर पत्रकारांना गुरूवार,दि.६ जानेवारी २०२२ रोजी अंबाजोगाईत दर्पण दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,ज्येष्ठ कवि गणपत व्यास,पञकार संघ,अंबाजोगाईचे विश्वस्त प्रा.नानासाहेब गाठाळ,पञकार संघ,अंबाजोगाईचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ या मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे.गुरूवार,दि.६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता नगरपरिषद मिटिंग हॉल,अंबाजोगाई (जि.बीड) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दर्पण दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शुक्रवार,दि.३१ डिसेंबर २०२१ रोजी पत्रकार संघ,अंबाजोगाईच्या कार्यकारिणीची बैठक झाली.या बैठकीत दर्पण दिन-२०२२ आयोजन व स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण या बाबत चर्चा होवून सर्वानुमते ठरले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघ,अंबाजोगाईचे माजी अध्यक्ष शिवकुमार निर्मळे हे होते.तर यावेळी माजी अध्यक्ष अविनाश मुडेगावकर,माजी अध्यक्ष प्रशांत बर्दापूरकर,सचिव रणजित डांगे,उपाध्यक्ष रवि मठपती,सहसचिव संतोष बोबडे,सदस्य देविदास जाधव आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »