पत्रकार आमजदखान यांचा छावा रत्न पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
लोकगर्जनान्यूज
बीड : येथील पत्रकार आरोग्य सेवक आमजदखान यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय छावा रत्न पुरस्कार घोषित करण्यात आले. मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरण करुन मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर आमजदखान यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अभिमान लाईव्ह चे आमजदखान पठाण हे पत्रकारिते सोबत आपलं वेळ हे गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून २४ तास वेळ देत अनेक गोरगरिबांना मदत करतात. तसेच मागे आयुष्यमान भारत हे आरोग्य ई-केवायसी कॅम्प घेऊन हजारो रुग्णांना मदत मिळवून दिली. या समाज कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांनी दखघ घेऊन आमजदखान यांना मानाचा छावा रत्न पुरस्कार घोषित केला. छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दि. ३ ऑगस्ट मुंबई येथे आयोजित यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा मानाचा पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आमजदखान यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.