पंकज कुमावत यांच्या पथकाची पुन्हा धडाकेबाज कारवाई
लोकगर्जना न्यूज
एएसपी पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यार धडक कारवाई मोहीम राबवून जिल्ह्यातील दोन नंबर वाल्यांना पळता भुई थोडी केली. सोमवारी रात्री कुमावत यांच्या पथकाने बीड शहरात जुगार अड्ड्यावर छापा मारुन जुगारी ताब्यात घेतले आहेत.
बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हिरालाल चौक येथे राणा चव्हाण हा घरासमोरील पत्र्याचे शेडच्या बाजूला काही इसमांना एकत्र जमवून झन्ना मन्ना हा पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून खेळ खेळवित असल्याची गुप्त खबऱ्या कडून पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली. या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोष मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी पाठवून त्या ठिकाणी रात्री 10 वाजता छापा मारला . या ठिकाणी झन्ना मन्ना जुगार खेळणारे सात इसम मिळून आले व एक इसम पळून गेला . त्यांच्याकडून नगदी ९३ हजार ८३० रुपये, मोबाईल , दुचाकी असा एकूण १ लाख ४७ हजार ८३० रुपये चा मुद्देमाल जप्त केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन ९ आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि संतोष मिसळे , पोहेकॉ बालाजी दराडे , पोना रामहरी भंडाने , राजू वंजारे , संतोष अहंकारे , बडे , जावळे , टूले यांचा या पथकात समावेश होता. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हा जुगार अड्डा बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याने याचा नागरिकांना खूप त्रास होता. या अड्ड्यावर पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारल्याने नागरिकांमधून पोलीस प्रशासनाचे आभार मानले जात आहे.