पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांचे होम पीचवर लक्षवेधी विधान;एक उमेदवारही केला घोषित?
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्हा म्हणजे पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांचे होम पीच आहे. आज ते बैलगाडा शर्यत उद्घाटनप्रसंगी 2019 मध्ये ताक पोळाल्या पासून ते विविध पक्षांच्या ऑफर पर्यंत सर्वच बाबींवर बोलत लक्षवेधी विधान केले. यामुळे येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील राजकीय चित्र काय? असणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. यावेळी त्यांनी एक उमेदवारीही घोषित केली.
भाजपाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शुक्रवारी ( दि. 30 ) बैलगाडा शर्यत आयोजित केली. या शर्यतीचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मा.मंत्री राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 2019 मध्ये ताक पोळाले असल्याने मी आता अशी परत चूक होऊ देणार नाही. मी एक भूमिका घेतली असून त्या भूमिकेशी पक्षानं सहमती दर्शवावी यासाठी प्रयत्न करणार आहे. अनेक जण माझ्यासाठी सकारात्मक असून मी त्यामुळे कोणाच्या बाबतीत नकारात्मक का बोलू? असा प्रश्न उपस्थित करत मला काही पक्षांकडून ऑफर आल्या आहेत. त्याकडे मी गांभीर्याने पाहिले नाही पण मी त्या दुर्लक्षित केल्या नाहीत. असे लक्षवेधी विधान केले. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा असून, त्यांना व खासदार प्रीतम मु़ंडे यांनाही डावलण्यात येत असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, बी आर एस आदी पक्षांकडून येत असलेल्या ऑफर यामुळे 2024 पुर्वी बीड जिल्ह्यातील राजकारणात काही ढवळाढवळ होणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
राजेंद्र मस्केना उमेदवारी घोषित?
पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांनी राज्याचे राजकारण बीड जिल्हा करतोय परंतु त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय. असे मी होऊ देणार नाही म्हणत येत्या निवडणुकीत मला तुमची साथ हवी असल्याचे जनतेला मला व राजेंद्र मस्केंना विजयी करा असे आवाहन केले. यामुळे या व्यासपीठावरून पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांना उमेदवारी घोषित केल्याची चर्चा होऊ लागली आहे.