नो टेन्शन! म्हत्वाच्या कामाला निघालात अन् पांढऱ्याशुभ्र कपड्यावर चहा पडला
लोकगर्जनान्यूज
तुम्ही म्हत्वाच्या कामासाठी बाहेर पडलात अन् पांढऱ्याशुभ्र कपड्यावर चहा पिताना चहा कपड्यावर पडल्याने डाग पडले तर निराश होऊन नका, Remove tea stains from clothes ही सोपी पध्दत वापरुन डाग नाहीसे करा. त्यासाठी ही माहिती पुर्ण वाचा
पांढरेशुभ्र कपडे घालून तुम्ही लग्न, मिटिंग अथवा इतर काही कामासाठी घराबाहेर पडलात मध्येच मित्र भेटले अन् त्यांनी चहाचा आग्रह केला. मित्रांचा आग्रह मोडता येत नाही. तुम्ही चहा पिण्यासाठी हॉटेल मध्ये गेलात अन् चहा पिताना अथवा घेताना चहा कपड्यावर पडल्याने डाग पडले. दुसरा शर्ट बदलण्यासाठी नाही. मग काय करणार? Remove tea stains from clothes नो टेन्शन चहा पडलेल्या ठिकाणी थोडं दूध लावा आणि हाताचे बोटाने थोडेसे घासा अन् त्यावर पाणी टाका चहाचा डाग पुर्णपणे गेलेला असेल ही ट्रिक ट्राय करून पहा.
चहाचा डाग सुकल्यानंतर दिसला आता काय?
आपण चहा पिताना कपड्यावर पडलेला चहा समजलाच नाही. तो वाळून गेल्यावर डाग दिसला. नाराज होऊ नका? शर्ट धुवून घेण्या आधी डाग पडला तेवढंच शर्ट पाण्याने ओला करावा. चहाचा डाग आहे त्याठिकाणी दूध टाकून हाताने घासा चहाचा डाग गायब झालेला दिसेल.
अथवा चहाचा डाग असलेला भाग ओला करून त्यावर डेटॉल साबण लावून हाताने चांगले घासा ( ब्रशचा वापर करु नये ) तुम्हाला डाग दिसणार नाही. या सोप्या पद्धतीने तुम्ही चहाचे डाग नाहीसे करु शकता.
नोट:- चहाचे डाग पडलेले कपडे तुम्ही या ट्रिक वापरण्याच्या अगोदर धुतले असतील तर ते डाग निघणार नाहीत. ते कायम स्वरुपी डाग आहेत. हे लक्षात असावे.