नूतन उपशिक्षणाधिकारी काझी माजेद यांचा सत्कार
लोकगर्जनान्यूज
बीड : राज्य सरकार कडून नुकतेच महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाशधकारी व तत्सम या संवर्गात पदोन्नती देण्यात आली. विशेष म्हणजे बीड जिल्हा परिषदेला चार अधिकारी मिळाले असून दोन उपशिक्षणाधिकारी तसेच गेवराई आणि माजलगाव तालुक्याला पदाचे गटशिक्षणाधिकारी मिळाले आहे. या पदोन्नतीत काझी माजेद यांना बीड जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी तथा शिक्षणाधिकारी (योजना) पदी नियुक्ती मिळाली आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने नूतन उपशिक्षणाधिकारी काझी माजेद यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजेद अहमद, संघटनेचे अन्य पदाधिकारी जफर खान, सय्यद रिजवान, शेख मसूद, कादरी नुरुल इस्लाम, मिर्झा अजमत बेग, नजीब सौदागर उपस्थित होते.