नूडल्स,पास्ताचा ट्रेंड ( Trend ) तरी आठवडी बाजार, जत्रेतील ‘या’ मेव्याची भूरळ कायम
लोकगर्जनान्यूज
फास्ट फूड चा काळ असल्याने खाण्याचे अनेक पदार्थ आले आहेत. हे पदार्थ ग्रामीण भागापर्यंत पोचले असून ऑनलाईन मार्केट मधून ऑर्डर देऊन मागविले जात आहे. मुलांचा खाणंपाणाच्या बदलत्या ट्रेंड ( Trend ) नुसार पास्ता, नूडल्स, मॅगी हे आवडीचे झाले.तरीही आठवडी बाजार अन् जत्रेतील जिलेबी,भजे, शेव चिवडा, गोडी शेव आदी मेव्याची भूरळ मात्र कायम आहे.
जग धावपळीचं व स्पर्धा ( Competition ) चे झाले. यामुळे खाण्या पिण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. प्रथमच ग्रामीण भागातील मुंबई-पुण्याला गेल्यावर किंवा येणाऱ्या कडून वडापाव हा शब्द ऐकण्यात यायचं. तेव्हा छोटी शहरे अथवा थोडं मोठं व रस्त्यावर असलेल्या गावात चहाचे हॉटेल असतं. नाष्टा करायचं म्हटलं तर पोहे, भजे , पुरी भाजी मिळे परंतु वडापाव नाही. पण आज प्रत्येक गावात वडापावचे गाडे दिसून येत आहे. तसेच चित्रपट सृष्टीतील नायक, नायिकांचे अनुकरण म्हणून पश्चिमात्य कपडे आले तसे खाद्य पदार्थही आले. तालुका असलेल्या शहरात आज सहज पिझ्झा, बर्गर, चायनीज सेंटर आहेत तर ग्रामीण भागातही याचे आगमन झाले आहे. ऑर्डर दिल्यानंतर चक्क खेड्यातही पिझ्झा, बर्गर पोचतो.शाळेत सकाळी जाणाऱ्या मुलांना डब्ब्यासाठी पहिली पसंती मॅगी, नूडल्स, पास्ताचा यासह काही खाद्यपदार्थांना आहे. हे पदार्थ आता आठवडी बाजारात विक्रीसाठी येत आहेत. तसेच किराणा दुकानांवर मिळतं आहेत. याची कितीही चलती ( Trend ) असेल परंतु आठवडी बाजारात व जत्रेतील जिलेबी, भजे, शेव चिवडा, गोडी शेव, बत्तासे, रेवडी याची भूरळ कायम आहे. अनेक आठवडी बाजारात व जत्रेतील मागणीवरून दिसून येत आहे. प्रत्येक आठवडी बाजारात हे दुकाने हमखास दिसून येतात. यावरुन नव्याची आवड असली तरी जुन्याची चव सुटत नाही? असे सांगितले जात आहे.