निसर्गाच्या बदलत्या रुपाने शेतकरी चिंतेत; पहिल्याच पावसानंतर आडस परिसरात धुकं

लोकगर्जना न्यूज
निसर्ग कधी कोणतं रुप दाखवलं याचा नेम नाही. मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस आडस ( ता. केज ) परिसरात पाऊस झाला. हा पहिलाच पाऊस आहे. परंतु प्रथमच पहिल्या पावसानंतर गुरुवारी ( दि. २३ ) परिसरात धुके दाटुन आल्याने परिसर यात हरवल्याचे चित्र दिसून आले. असं प्रथमच घडत असल्याची प्रतिक्रिया वृद्ध शेतकरी व्यक्त करीत आहेत. धुकं पिकांसाठी मारक असून यामुळे पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. सध्या पेरण्या नाहीत त्यामुळे नुकसान नाही. परंतु पेरण्या झाल्यावर जर धुकं पडलं तर शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढेल म्हणून शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
धुके दाटुन येणे ही नेहमीच असते परंतु पावसाळा संपताना व थंडीच्या काळात असतो. परंतु आडस व परिसरात काल वेगळंच चित्र दिसलं. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस दुपारी या परिसरात पाऊस झाला. या वर्षातील पहिलाच पाऊस आहे. यानंतर गुरुवारी ( दि. २३ ) सकाळी धुकं पडलं होतं. असे चित्र प्रथमच दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. धुकं हा पिकांसाठी मारक असून, यामुळे पिकांवर बुरशी सह विविध रोगांचा प्रादुर्भाव पडतो. तसेच धुक्यानंतर पाऊस येत नाही असाही अंदाज असतो.सध्या पेरण्या झालेल्या नसल्याने धुकं आलं तरी काही नुकसान परंतु पेरण्या झाल्यानंतर ही धुकं पडत राहिले तर कासे होणार? धुक्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना सुरवातीलाच पिकांची फवारणी करावी लागेल. यासाठी येणाऱ्या खर्चाचं भुर्दंड सोसावा लागणार. पहिला पाऊस पडताच धुकं दाटून आल्याने आता पाऊस कधी पडणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी निसर्ग वेगवेगळे रुप दाखवत आहे. अनेक वर्ष जिल्ह्यातील जनतेने दुष्काळाचा सामना केला. दोन वर्षांपासून समाधान कारक पाऊस होत आहे. परंतु परतीचा पाऊस हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ लागला. मागील दोन्ही वर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीन,कापसाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी पाऊस काळ चांगले राहिलं असे सर्वांचे अंदाज होते. पण जून महिना संपत आला तरी पेरणी योग्य पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. पाहिला पाऊस पडताच धुकं दाटून आल्याने या बदलत्या निसर्गाच्या रुपाने शेतकरी चिंतेत आहेत.
घाबरण्याचे कारण नाही – डॉ. विजयप्रकाश ठोंबरे ( कृषी शास्त्रज्ञ )
या दिवसात धुकं पडत नाही हे सत्य आहे. परंतु हवेत आर्द्रता वाढली तर ते धुक्यासारख दिसत. हवेत आर्द्रता वाढली की, नाही. मी तेथे नसल्याने नक्की सांगता येणार नाही परंतु तसेच असू शकते. यामुळे काही फरक पडणार नाही. असे कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.