भवताली
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा बँकेकडून सन्मान
लोकगर्जनान्यूज
आडस : पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आडस शाखेकडून सन्मान करण्यात आला.
शुक्रवारी ( दि. १४ ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यानंतर आडस, मोरफळी, केकाणवाडी, केंद्रेवाडी आदि काही ठिकाणच्या नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक सुरेंद्र नंदकिशोर झाडे, प्रशासकीय अधिकारी अंकुश बर्दिया, रोखपाल निखील सांगळे, सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर, अंगद पाटील, जनार्दन माने, नितीन ठाकूर, कौसलसिंह पवार, मधुकर गडदे आदींची उपस्थिती होती.