कृषी
निधन वार्ता विलास तरकसबंद यांचे निधन
आडस : येथील व्यापारी विलास तरकसबंद यांचे अल्पशा आजाराने लातूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
कृष्णा ज्वेलर्सचे संचालक विलास तरकसबंद हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लातूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी ( दि. १२ ) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ऑईल मिल जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शांत, संयमी, सर्वांत मिळून मिसळून रहण्याचा विलास तरकसबंद यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.