नित्रुड प्रकरण: त्या मुलाचा खून तिघांवर गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
माजलगाव : तालुक्यातील नित्रुड येथे सकाळी एका मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गळा दाबून खून केल्याचा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख ( वय १५ वर्ष ) रा. नित्रुड ( ता. माजलगाव ) हा आपल्या बहिणी सोबत मंगळवारी ( दि. १८ ) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आजोबा उस्मान कासम शेख यांच्या शेतात सरपन आणण्यासाठी गेले. यावेळी तिघांनी अडवून गुलाम मोहम्मद यास मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून बहिण धावत घरी आली व तिघेजण भावाला मारहाण करत असून ओढणीने गळा दाबत असल्याचं सांगितलं. हे ऐकताच वडील मुर्तुजा शेख यांनी शेताकडे धाव घेतली असता तोपर्यंत सगळं संपलेलं होतं. गुलाम मोहम्मद याचा मृतदेह झाडाला लटकविण्यात आला होता. तेथे मुर्तुजा हे जाण्या अगोदर सुलतान शेख व उस्मान शेख हे हजर होते. त्यांना पाहून मृतदेह झाडाला लटकवित असेले आरोपी कैलास उर्फ पिंटू डाके , हनुमंत वानखेडे व महादेव सुंदरराव डाके यांनी आम्हाला पाहून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी मयत गुलाम हुजेफा याचे वडील मुर्तुजा शेख यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आरोपी कैलास उर्फ पिंटू डाके , हनुमंत वानखेडे, महादेव सुंदरराव डाके या तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत मुलगा हा केवळ १५ वर्षांचा असून त्याची व मारेकऱ्यांची नेमकी काय दुश्मनी होती? तिघांनी मिळून एका निरागस मुलाचा गळा घोटला असा प्रश्न उपस्थित करत हळहळ व्यक्त केली जात आहे. दिंद्रुड पोलीस अधिक तपास करत आहेत.