नावात बदल दत्ताचं झाला कुत्ता अन्… त्याचा निषेध प्रकार वाचून अवाक व्हाल!
लोकगर्जनान्यूज
आज कोण काय करेल याचा नेम नाही. एका व्यक्तीचा राशन कार्डवर नाव चुकलं आणि दत्ता ऐवजी कुत्ता झालं. दुरुस्तीसाठी त्यानं अनेक चकरा मारल्या पण काहीच परिणाम नाही. मग त्यानं संबंधित अधिकाऱ्याचे वाहन आडवले आणि कुत्र्यासारखा भुंकू लागला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सदरील घटना पश्चिम बंगाल मधील बाकुरा जिल्ह्यातील असल्याचा दावा केला जात आहे. भुंकणाऱ्या व्यक्तीचे नाव श्रीकांत कुमार दत्ता आहे. याने राशन कार्ड बनवलं त्यावेळी चुकून दत्ता चे कुत्ता असे आडनाव झाले. ही चुक लक्षात येताच श्रीकांत यांनी अनेक वेळा नावातील चुक दुरुस्त करण्याची मागणी केली. आपलं काम धंदा सोडून तो संबंधित कार्यालयाचा उंबरा झिजवत आहे. पण याकडे कोणीही लक्ष देईना व त्यांचे दत्ता नाव करुन देईना यामुळे संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने रस्त्यावरच अधिकाऱ्याचे वाहन आडवले आणि कुत्र्यासारखा भुंकू लागला. हा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला अन् तो आता खूप व्हायरल होत आहे. संबंधित अधिकारी काही कागद एका व्यक्तीच्या हाती देत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारामुळे खरंच त्याच्या नावात दुरुस्ती झाली का? असे वाटते परंतु याबाबत आणखी स्पष्ट झालेले नाही.