आपला जिल्हा
नागेश पवारांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
लोकगर्जनान्यूज
बीड : सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले नागेश पवार यांनी अनेक कार्यकर्त्यांसह रविवार (दि.४) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
बीड शहरातील भटके विमुक्त समाजासाठी काम करणारे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर सक्रिय असलेले कार्यकर्ते नागेश पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त जाती-जमाती मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश पवार कार्यरत होते. प्रवेश कार्यक्रमाला आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व या भागातील नागरिक उपस्थित होते.