क्राईम

नागरिकांनो सावधान! एटीएमचे पीन बदलताना केजमध्ये घडला धक्कादायक प्रकार

लोकगर्जनान्यूज

केज : नवीन एटीएम कार्ड आल्याने एक व्यक्ती पीन बदलण्यासाठी एटीएमवर गेला अन् त्या सोबत एक धक्कादायक प्रकार घडला असून एक छोटीशी चूक ३८ हजारला पडली. यामुळे एटीएम मध्ये सावधान रहाण्याचे आवाहन करण्यात येत असून मोठ्या शहरातील हे लोण आता केज सारख्या छोट्या शहरांपर्यंत पोचले आहे.

शिवदास हरिदास करांडे रा. केकतसारणी ( ता. केज ) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे नवीन एटीएम कार्ड आल्याने ते ( दि. १३ ) ऑक्टोबर सकाळी शहरातील कळंब रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएमवर गेले. यावेळी त्यांनी एटीएमचा पीन बदलला ते सक्सेस झाला का? ते मोबाईलवरील मेसेज वाचताना पाठी मागे उभा असलेल्या अनोळखी व्यक्तीने दुसरें एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकून करांडे यांचे कार्ड काढून अदलाबदल केली. करांडे पीन चेंज झाले म्हणून कार्ड घेऊन गेले. यानंतर करांडे यांना सकाळी मोबाईलवर मेसेज आले. यामध्ये दोन वेळा ५ हजार अन् तीनवेळा ९ हजार ५०० असे तब्बल ३८ हजार खात्यातून परस्पर कोणीतरी काढून घेत असल्याने ते बँकेकडे आले असता एक अनोळखी व्यक्ती दिसला त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो हाताला हिसका मारुन पळून गेला. या प्रकरणी शिवदास करांडे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. केज पोलीस तपास करीत आहेत. या प्रकारच्या घटना मोठ्या शहरात घडत असे परंतु आता हे लोण केज सारख्या छोट्या शहरांपर्यंत पोचले आहे. यामुळे नागरिकांनी एटीएम मध्ये सावधान रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »