नकोशी गर्भात मारणारा बीड जिल्हा सांभाळ होईल तिथे जिवंत सोडून जाण्या पर्यंत पोचला

लोकगर्जनान्यूज
नकोशी गर्भपात प्रकरणी बीड जिल्हा, डॉक्टर असलेलं मुंडे दांपत्य खूप गाजलं आहे. या प्रकारामुळे ऊसतोडी करुनही तीन-चार मुली सांभाळणारा बापही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. इतकी बदनामी होऊनही जिल्ह्यातील काहींना मुलगी नकोच आहे. परंतु या मुलीला नकोशी वाटणाऱ्या मध्ये पोटात मारण्या ऐवजी जन्माला आल्यानंतर सांभाळ होईल अशा ठिकाणी टाकून जाण्यापर्यंत बदल झाल्याचे कालच्या घटनेतून दिसून आले.
बीड येथे पाली रस्त्यावर बिंदुसरा प्रकल्प भागात निसर्गाच्या सानिध्यात बारगजे दांपत्याचे इनफंट इंडिया नावाने सेवा यज्ञ सुरू आहे. येथे ते एचआयव्ही बाधित दांपत्याच्या मुलांचे व बाधित मुलांचा सांभाळ करतात. ( जिथे आई-वडील एचआयव्ही बाधित आहेत म्हणून त्यांच्या मुलाला शाळेत येऊ दिले जात नाही. यासाठी डॉ. दत्ता बारगजे यांना जिल्हाधिकारी कार्यालय समोर सत्याग्रह करावं लागलं शाळेत बसूद्यावे या मागणीसाठी परंतु काहीच उपयोग झाला नाही. ) या सेवा केंद्रा समोरुन धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जातो. काही लोकं येथे थांबून मदत करतात. परंतु काहींना घाई असते म्हणून ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत. अशा मदत करणाऱ्यांसाठी महामार्गाच्या बाजुला इनफंट इंडियाने दान पेटी लावली आहे. येथे लोकं कपडे, खायच्या वस्तू ठेवतात. कोणी दान पेटीत रोख रक्कम टाकतो. परंतु काल रविवारी ( दि. १८ ) या दान पेटीच्या खाली नकोशी टाकून का ठेऊन? ( काय म्हणावे ) त्या अज्ञातांनी पळ काढला. ही डॉ. दत्ता बारगजे व त्यांच्या सहचारिणी हे तिथून येताना ही नकोशी दिसून आली. ही माहिती त्यांच्या फेसबुक पोस्ट मुळे जिल्ह्यात पोचली. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला तर, बहुतांश लोकांनी ती सुरक्षित हातात पोचली, तीचा योग्य सांभाळ होईल असे समाधान व्यक्त केले. पण बीड जिल्ह्यात आजही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच आहे. अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आधीच नकोशींना गर्भात मारणारा जिल्हा म्हणून बदनामीचा काळा डाग आहे. त्यात पुन्हा काही असे महाभाग काही दिवसांपूर्वीच अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील एका स्वच्छता गृहातील बकेट मध्ये पाण्यात बुडालेल्या अवस्थेत नकोशी मृतावस्थेत आढळून आली. यानंतर हा प्रकार परंतु ही नकोशी जिवंत असून तीचे संगोपन व सांभाळ चांगल्या प्रकारे होईल. ती योग्य ठिकाणी अन् हाती असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.