धो…धो… पाऊस कोसळतोय… वैरणीचे दोन बिंडे पाठवा: शेतकऱ्याची ॲमेझॉनला ऑर्डर
ॲडिओ क्लिप होतोय सोशल मीडियावर व्हायरल
लोकगर्जना न्यूज
चार दिवसांपासून धो…धो.. पाऊस कोसळतोय..चिखल झाल्याने शेतात जाता येत नाही. चाऱ्याविन मसर ( म्हशी ) ओरडत आहेत. त्यामुळे दोन बिंडे ओली वैरण हवी आहे म्हणून एका शेतकऱ्याने चक्क ॲमेझॉनला फोन केला. त्याची ॲडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हा शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील असल्याचं फोनवर सांगत आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या झाडी…डोंगार…हाटेल… नंतर आता राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या वैरण क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची गुहाटी येथील हॉटेल मधील एका कार्यकर्त्याला खिडकीतून दिसणारं वातावरण झाडी, डोंगर चे आपल्या रांगड्या बोली भाषेची क्लिप व्हायरल झाली. यातील डायलॉगने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. शाहजी बापू पाटील हे नाव माहित झालं. हे आठवण्याचे कारण म्हणजे सांगोला येथीलच आणखी एका पाटलांची ॲडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय, त्यांचे नाव आहे राजेंद्र पाटील यांनी चक्क ॲमेझॉनला फोन लावला. इकडे चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्वत्र चिखल झाल्याने शेतात जाता येत नाही. चारा नसल्याने जनावरं हंबरुन ओरडत आहेत. त्यांच्यासाठी दोन बिंडे ओली वैरण ( चार ) पाठवून द्या असे म्हणत आहेत. यातील संवाद हा खूप मजेशीर असून, खरच ही अडचण आहे की, मजा म्हणून फोन केलाय हे त्यांनाच माहीत. परंतु ही ॲडिओ क्लिप सध्या व्हायरल होतं आहे.
ॲमेझॉन कडून बोलणाऱ्या महिलेचे संयमाने उत्तर
समोरुन बोलणारी व्यक्ती शेतकरी असून, ते जनावरांसाठी चारा मागत असल्याचे समजले. पण ती महिला मी चेक करुन पहाते व सांगते असे म्हणते. शेतकरी राजेंद्र पाटील दोन बिंडे ओली वैरण ( चारा ) संध्याकाळ पर्यंत पोहचेल का? असं विचारतात. ती महिला यासाठी चार ते पाच दिवस लागतात. शेतकरी आहो मॅडम माणसं उपाशी रहातील जितराब कसं राहील अडचण आहे म्हणून फोन केला असे म्हणतात. ती महिला संयमाने या व्यतिरिक्त आणखी काही मदत करु का? असे विचारत आहे.