धारुर शहरात खळबळ भांडणामध्ये डोक्याला मार लागून एक ठार

लोकगर्जनान्यूज
धारुर : येथील तेलगाव रोडवर वर्दळीच्या रस्त्यावरील विजय बार समोर काहीतरी क्षुल्लक कारणावरून भांडणं झाले. यामध्ये डोक्याला मार लागून एकजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ( दि. २ ) सायंकाळी घडली. या घटनेने धारुर शहरात एकच खळबळ माजली आहे.
नितीन मोहन धोतरे ( वय ४० वर्ष ) रा. धारुर असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी ( दि. २ ) सायंकाळी नितीन धोतरे व शहरातील काही तरुणांचे तेलगाव रस्त्यावरील विजय बिअर बार समोर काहीतरी कारणावरुन वाद झाला. यानंतर तो हनामारी पर्यंत पोचला यात डोक्यात मार लागल्याने नितीन धोतरे याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच पोलीसांनी धाव घेतली. याप्रकरणी बातमी लिहपर्यंत पोलीसात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पोलीस तपासात याप्रकरणी उलगडा होऊन नेमकं प्रकार काय? समोर येईल.