धारुर येथे मोबाईल टॉवर तर खोडसमध्ये वीज कोसळली;पाचजण जखमी
लोकगर्जनान्यूज
धारुर तालुक्यात वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह दुपारी हलका पाऊस झाला. यावेळी वादळीवाऱ्यामुळे धारूर शहरातील बीएसएनएलचे टॉवर कोसळे असून यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. तसेच तालुक्यातील खोडस येथे वीज कोसळल्याने गोठा जळाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. सुदैवाने जिवितहानी टळली.
आज शनिवारी ( दि. ११ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धारुर तालुक्यातील काही भागात जोरदार वादळीवारा वीजेच्या कडकडाटासह हलका पाऊस पडला. परंतु यावेळी जोरदार वादळी वारे असल्याने धारुर शहरातील संभाजीनगर झोपडपट्टी मधील शिकलकरी समाजाच्या घरावर बीएसएनएलचे मोबाईल टॉवर पडले, यामध्ये योगेंदरसिंग ( वय २५ वर्ष ) गंगा कौर ( वय २२ वर्ष ), राधा कौर ( ८ वर्ष ), दस्मित कौर ( ५ वर्ष ), पुनम कौर ( ६ वर्ष ) असे पाचजण जखमी झाले आहेत. यातील चौघा जखमींना अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यापुर्वीच या धोकादायक टॉवर बाबतीत बीएसएनएल कडे तक्रार करण्यात आली होती. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने आज हा अनुचित प्रकार घडला. तसे खोडस ( ता. धारुर ) येथे साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतकरी भास्कर नरहरी लाखे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली झाडासह लागून असलेला गोठा आणि आतील इतर साहित्य जळून खाक झाले. परंतु गोठा जळालेला पाहून शेतकऱ्यांनी आतील वासरे सोडून दिल्याने मोठं नुकसान टळले आहे.