धारुर येथील पत्रकार दिगांबर शिराळेंचा अपघाती मृत्यू
लोकगर्जना न्यूज
चोरंबा येथे घरी जात असलेल्या दिगांबर शिराळे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. सदरील घटना बुधवारी ( दि. १ ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धारुर-तेलगाव राष्ट्रीय महामार्गावर चोरंबा-थेटेगव्हाण दरम्यान घडली आहे. दिगांबर शिराळे हे सायं दैनिक सिटीझन मध्ये धारुर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दिगांबर शिराळे हे थेटेगव्हाण येथून आपल्या चोरंबा गावाकडे दुचाकी क्रमांक एम. एच. ४४ वाय ३३७६ वर येताना दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले परंतु सदरील वाहन चालकाने मदत न करता पळून गेला. काहींनी मदत करत त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय धारुर येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात रेफर करण्यात आले. अंबाजोगाई येथे जाताच डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित. शिराळे यांचा अंबाजोगाई येथे जाण्यापूर्वी रस्त्यातच मृत्यू झाला असावा, मनमिळाऊ स्वभावाचा एक तरुण पत्रकाराचे अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. धडक देऊन पळून गेलेल्या वाहनाचा शोध लावावा अशी मागणी धारुर येथील पत्रकारांनी पोलीसांकडे केली. दिगांबर शिराळे यांच्या पार्थिवावर आज मुळ गावी चोरंबा येथे ११ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.