धारुर तालुक्यात खळबळ! पोलीसाने घरात घुसून केला विनयभंग
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने तालुक्यातील एका गावात घरात घुसून हाताला धरुन लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग केला. याप्रकरणी सदरील पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलीसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही बातमी तालुक्यात पसरताच खळबळ उडाली आहे.
ज्यांच्यावर संरक्षण करण्याची जबाबदारी तेच उलट करत असतील तर न्याय मागायचा कुणाला? असा प्रश्न निर्माण जनतेतून विचारला जात आहे. याला कारणही तसेच असून धारुर पोलीस ठाणे येथील कार्यरत सहाय्यक फौजदार ( ASI ) पदावरील पोलीस कर्मचाऱ्याने सोमवारी ( दि. ३१ ) रात्री तालुक्यातील एका गावातील घरात घुसून ऊसतोड मजूर महिलेचा हात धरून नोट दाखवत महिलेला लज्जा वाटेल असे बोलून विनयभंग केला. सकाळी हा प्रकार तीने घरात सांगितला असता पुर्ण कुटुंबच संबंधित पोलीसावर गुन्हा दाखल करा म्हणून ठाण्यात दाखल झालं. ते आपल्या भुमिकेवर ठाम राहिल्याने अखेर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुंड असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे ( फिर्यादीला दिल्या जाणाऱ्या प्रत मध्ये पुर्ण नाव नाही) . पोलीसानेच महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस येताच तालुक्यात खळबळ उडाली असून जर पोलीसच असे कृत्य करत असतील तर विश्वास ठेवावा कोणावर? असा प्रश्न जनता विचारत आहे.
पिण्यासाठी पाणी मागून धरला हात अन्….
संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने भूक लागल्याचे सांगत जेवण मागितलं पण स्वयंपाक करते म्हणून महिला म्हणाली तर पाणी पाणी मागितले पाणी देत असतानाच हात पकडून पाचशे ची नोट दाखवत खिशात ७ हजार रुपये असून मला आज रात्री तुझ्या जवळ झोपुदे असे बोलून विनयभंग केला. मी आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले. व पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन गेले. नंतर ठाणे प्रभारी यांना घटनेची माहिती दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.