धारुर तालुक्यातून एकतेचा संदेश; हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार

लोकगर्जनान्यूज
धारूर : तालुक्यातील अंजनडोह येथे अखंड हरिनाम सप्ताह,भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे, तर मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना व उपवास सुरू असतांना सामाजिक ऐक्याचा भाव म्हणून हिंदू बांधवांच्या वतीने १२ एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करून हिंदु-मुस्लिम एकोप्याने राहुन एक वेगळा पायंडा पाडुन दोन्ही समाजाने समाजापुढे आदर्श निर्माण केला. खऱ्या अर्थाने समाजाने त्याचे अनुकरण करणे समाजाच्या स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. अंजनडोह वासीयांनी अशा प्रकारचे सामाजिक ऐक्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करून गावाची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
अंजनडोह येथील हिंदु आणि मुस्लिम बांधवांमध्ये अनेक वर्षांपासून असलेला जातीय सलोखा कायम रहावा व येणाऱ्या नव्या पिढीमध्येही या जातीय सलोख्याची बीजे पेरली जावीत यासाठी अंजनडोह येथे सातत्याने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.येथील ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडपामध्ये मुस्लिम बांधवांसाठी रोजा-इफ्तारची पंगत देऊन सामाजिक ऐक्याचा संदेश धारूर तालुक्याने दिला. यावेळी सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून आम्ही सर्व गावकरी एक आहोत,असा सामाजिक संदेश दिला.
यावेळी प्रथमतः शेख असाहबोद्दीन यांनी रोजा-इफ्तारचे आयोजन केल्या बद्दल गावकऱ्यांचे आभार मानले व रमजानच्या पवित्र महिन्याचे महत्व विशद केले. धारूर पंचायत समितीचे मा.उपसभापती सुदर्शन अण्णा सोळंके, मा.सरपंच सुबराव सोळंके,सरपंचपुत्र प्रमोद सुर्यकांत सोळंके,उपसरपंच प्रकाश आबा सोळंके यांनी मुस्लिम बांधवांचे मनापासुन स्वागत केले व पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी बाबुराव गुरूजी सोळंके,अमर सोळंके, सुधीर सोळंके,अरुण अदमाने,संदीप शिंपले,राजाभाऊ सोळंके,धर्मराज नाना सोळंके,अमोल सोळंके, अनसर शेख,सय्यद चाँद, निजाम पठाण,दत्तात्रय सोळंके,धर्मराज गायके, माऊली सोळंके, श्रीधर सोळंके, सुनील पाटील,शफिक सय्यद,ऋतूपदम सोळंके,अशोक सोळंके बिबीशन सोळंके यांच्यासह हिंदु-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजा इफ्तारचा सर्वांनी एकत्र आनंद घेतला व पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमातुन हिंदु-मुस्लिम सामाजिक ऐक्य दिसून आले.