धारुर तालुक्यातील त्या अपघातातील दोघांचा मृत्यू; एकजण अत्यवस्थ
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : सकाळी धारुर तालुक्यात घडलेल्या अपघातातील दोन जखमींचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. यातील मयत तरुण पोलीस भरतीची तयारी करत होता. पण या अपघातामुळे त्याचे स्वप्न भंग झाले असून तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खामगाव-पंढरपूर महामार्गावरील थेटेगव्हाण ( ता. धारुर ) जवळ सकाळी टिप्पर आणि आप्पे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान संतोष नारायण बडे, गवळण तिडके यांचा मृत्यू झाला. एका जखमीची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे. मयत संतोष बडे हा तरुण पोलीस भरतीची तयारी करत होता. परंतु या अपघाताने त्यालाच हिरावून घेतले असल्याने कुटुंबाचे संतोष यांना पोलीस पहाण्याचे स्वप्न भंग झाले.