क्राईम

धारुर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा एक मुख्याध्यापक निलंबित; सीईओ अजित पवार यांची कारवाई

बीड : गैरव्यवहार, कामात कुचराई अथवा शिक्षक विभागाला डाग लागेल असे काम करणाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार हे कारवाईतून सरळ करीत आहेत. आजही अपहार केल्याप्रकरणी धारुर तालुक्यातील एका केंद्रीय मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. निलंबित मुख्याध्यापकाची विभागीय चौकशी लागली असल्याचे सांगितले जात आहे.

रमेश नखाते असे निलंबित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते धारूर तालुक्यातील अंजनडोह जि.प.कें . प्रा . शाळेअंतर्गत केंद्रीय मुख्याध्यापक असून, त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपुर्वी शिक्षकांच्या वेतनातील आयकर ८ लाख ४६ हजार ३४६ तसेच एलआयसीच्या ८९ हजार ६७० रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. याबाबतीत शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्याकडे केंद्रातील ५५ शिक्षकांनी तक्रार दाखल केली . या तक्रारीची दखल घेवून सीईओ अजित पवार यांनी सदरील मुख्याध्यापकास सोमवारी सेवेतून तडकाफडकी निलंबित केले . त्यांची विभागीय चौकशीही लावली. चौकशीनंतर अपहाराची रक्कम या मुख्याध्यापकाकडून वसूल केली जाणार आहे . निलंबित मुख्याध्यापकाचे निलंबन काळात मुख्यालय माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय राहणार आहे . गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पुर्व परवानगीशिवाय या मुख्याध्यापकास मुख्यालय सोडता येणार नाही. सदरील मुख्याध्यापकाचे उपस्थिती प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधिताचा निर्वाह भत्ता अदा करण्यात येवू नये , असे आदेश सीईओंनी धारूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले . तसेच निलंबन काळात खासगी नोकरी, उद्योग करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, आदेशाची नोंद सदर मुख्याध्यापकाच्या मुळ सेवा पुस्तीकेत घेण्यात यावी असेही सीईओंनी आपल्या आदेशात म्हटले आहे. यापुर्वीही सीईओ अजित पवार यांनी पत्त्याच्या क्लबवर सापडलेले, माजलगाव तालुक्यातील आपसातील वादातून आत्महत्येचा प्रयत्न प्रकरण हे आताचे अपहार प्रकरणी तातडीने दखल घेऊन निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईच्या दणक्याने शिक्षण विभागाला चांगलीच शिस्त लागेल यात शंका नसून, चुकीचं काही करण्या ऐवजी दहा वेळा कर्मचारी, शिक्षक विचार करतील अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »