धारुर घाटात थरार….चालत्या कारने घेतला पेट
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : येथील घाटातून तेलगावच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतल्याने काही काळा घाटातील वाहतूक बंद होती. हा थरार अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये घटना कैद केली.
धारूरचा घाट अन् अपघात हे समिकरण बनले असून, काही जण तर अपघात घाट म्हणून याचा उल्लेख करत आहेत. परंतु याच्या रुंदीकरणाकडे प्रशासन,शासनाचे दुर्लक्ष आहे. आज शनिवारी ( दि. 1 ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घाटातील एका वळणावर थरार अनुभवायला मिळाला. धारुर येथून तेलगावच्या दिशेने चाललेली कार क्र. MH 14 CS 5352 घाटाची खाली उतरुन पायथ्याशी असलेल्या वळणाजवळ गेली असता अचानक पेट घेतला. चालक व प्रवाशांनी प्रसंगावधान राखून कारमधून बाहेर पडले यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु कार पुर्ण जळून खाक झाली. कार जळत असल्याने वाहतूक बंद होती त्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.