धारुर घाटात अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
लोकगर्जनान्यूज
धारुर : येथील घाटात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी ( दि. ११ ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील ग्रामीण रुग्णालयात जखमीवर उपचार करुन प्रकृती चिंताजनक असल्याने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात रेफर करण्यात आले.
धारुर येथून जाणाऱ्या खामगाव -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शहराजवळील अवघड घाटात अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत परभणी जिल्ह्यातील कोहळतांडा येथील दुचाकीस्वार चुन्नीलाल पुरा कोराई ( वय ५५ वर्ष ) हे गंभीर जखमी झाले. काही प्रवाशांनी मदत कर जखमी चुन्नीलाल यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय धारुर येथे दाखल केले. येथे प्रथम उपचार करुन प्रकृती चिंताजनक असल्याचे पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले. हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती नसून, घटनास्थळाच्या परिस्थितीवरून एखाद्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत पोलीस तपासात अपघाताचे कारण स्पष्ट होईल.