लोकगर्जनान्यूज
बीड : नवी स्कॉर्पिओ आणली म्हणून मित्रांनी दुचाकी रस्त्यालगत उभ्या करुन गाडी पाहू लागले. यावेळी धारुरकडे येत असलेल्या बसच्या चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस सरळ दुचाकींना धडकून स्कॉर्पिओवर जाऊन आदळली.या अपघातात वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे. सुदैवाने मनुष्यहानी टळली आहे.
धारुर शहरातील तिबोले यांनी नवीन स्कॉर्पिओ घेतली आहे. या नव्याकोऱ्या गाडीसह ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात थांबले होते. यावेळी त्यांचे काही मित्र आले व नवी गाडी पाहून ते थांबले. त्यांच्या दुचाकी रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी राज्य परिवहन महामंडळ धारुर आगारची बस क्र. एम.एच. २० बी एल २९३० च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ तिन्ही दुचाकी आणि स्कॉर्पिओवर जाऊन धडकली यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली आहे. पण वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.