क्राईम
धारुरच्या किल्ल्याजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

धारूर : येथील भुईकोट किल्ल्याच्या जवळील खोरीत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
धारुर येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ला असून, या जवळील लाला खडक म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोरीत सकाळी एक मृतदेह आढळून आला. ही घटना शहरात पसरताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. आत्महत्या की, घातपात याबाबत पोलीसांच्या तपास व शवविच्छेलन अहवालानंतर उघडकीस येईल. या घटनेने मात्र धारुर शहरात खळबळ उडाली आहे.