लोकगर्जनान्यूज
शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा वाद राज्यात सुरु होता. ठाकरे व शिंदे गटाकडून हे चिन्ह आणि नाव आमचंच म्हणून दोन्ही गटाकडून पुरावे सादर करण्यात येत होते. या प्रकरणी आज निवडणूक आयोगाने निर्णय देत धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव शिंदे गटाला बहाल केले. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील सत्तांतर होऊन शिंदे , फडणवीस यांचे सरकार आले. यानंतर शिवसेना व धनुष्यबाण कोणाचं या वाद सुरू झाला. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गटाकडून शिवसेना व धनुष्यबाण यावर दावा करण्यात आला. हे चिन्ह अन् नाव मिळविण्यासाठी पुरावे सादर करण्यात येत होते. या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिलं तसेच शिवसेना नाव ही त्यांनाच देण्यात आले. यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीत याचा आता शिंदे गटाला किती फायदा होणार हे येणारा काळच ठरवेल.