लोकगर्जना न्यूज
माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांचा दि. १५ जुलै वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना सोलापूर येथील एका तरुण समर्थकाने अनोखी भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेट वस्तूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
सोलापूर येथील सनी देवकते असे त्या तरुणाचे नाव आहे. सोलापूर म्हणजे तो काय भेट देणार? हे जवळपास तुम्ही ओळखलं असेल…हो तुम्ही विचार करताय तेच सोलापूरची ओळख सोलापूरी चादर भेट दिली.पण तुम्ही विचार करत असाल यात काय विशेष? यात विशेषच आहे. या चादरवर धनंजय मुंडे यांची प्रतिमा असलेली ही चादर असून, विशेष म्हणजे ती विणलेलीच तशी आहे. सनी देवकते यांनी परळी येथे येऊन आपल्या नेत्याला शुभेच्छा देऊन ही अनोखी भेट दिली आहे. ही खास ऑर्डर देऊन बनवलेली चादर असून या अनोख्या भेटीची चर्चा जोरदार सुरू आहे.
अनोखी भेट द्यायची असा निश्चय होता – सनी देवकते
माझे आवडते नेते धनु भाऊ यांना वाढदिवसा निमित्त काहीतरी अनोखी भेट द्यायची असा विचार करत होतो. कोणी गाडी देतो कोणी काही देतो हे कॉमन आहे. आपल्या वेगळ काय देता येईल असा विचार करत असताना मनात आलं की, आपली सोलापूरी चादर राज्यातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. तीच द्यावी पण त्यावर भाऊंची प्रतिमा आसावी, मग सोलापूर येथे फिरुन विचारले की, प्रतिमा ( फोटो ) असलेली सोलापूरी चादर बनवून मिळेल का? एकानं होकार दिला. धनंजय मुंडे यांची प्रतिमा असलेली सोलापूरी चादर बनवून घेऊन वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १५ जुलै २०२२ रोजी त्यांना दिली. अशाच चादरी बनवून त्या वृध्दाश्रम, अनाथाश्रम येथे वाटप करण्याचा विचार आहे असे सनी देवकते यांनी सोलापूर येथील एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.