धक्कादायक! मा. आ. विनायक मेटे यांचे अपघाती निधन
लोकगर्जना न्यूज
बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष मा. आ. विनायक मेटे यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी असलेल्या मेटेंचे दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले. या वृत्ताने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विनायक मेटे हे बीड येथून मुंबईला जात होते. दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली जवळील बोगद्याजवळ अचानक मेटे यांच्या गाडीत काहीतरी बिघाड झाला. गाडी साईडला जाऊन आदळून झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे. त्यांना उपचार मिळण्यासाठी उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. मेटे यांच्या निधनाची बातमी बीड जिल्ह्यात धडकताच अनेकांना धक्का बसला आहे. हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणाचा आवाज हरवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.