आपला जिल्हा
धक्कादायक! भाजपाचे बीड शहराध्यक्ष बियाणीचीं आत्महत्या
लोकगर्जना न्यूज
बीड : भाजपाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यांनी स्वतःच्या घरीच सकाळी गोळी झाडून घेतली आहे. या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बीड शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार चेहरा म्हणून बियाणी यांच्याकडे पाहिले जायचे. ते भाजपाचे बीड शहराध्यक्ष होते. त्यांनी शहरातील एमआयडीसी परिसरातील रहात्या घरी स्वतःच गोळी झाडून घेतली. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने बीड शहरात एकच खळबळ माजली आहे .